Posts

Showing posts from July, 2024

पाठीवरची थाप..!!!

Image
  पाठीवरची थाप..!!!   Pune Passion Icons 2024... गरजेची असते खुप गरजेची; असं ! कां म्हणून काय विचारता..??? पार पाळत आलेल्या कर्तव्यांची... पुर्ण करत आलेल्या स्वप्नांची... आखलेले ध्येय प्रयत्नी लावण्याची... कर्तव्यांचा मान राखून (as much as possible) स्वतः चा छंद जोपासण्याची... पावती नाही कां लागत; समाधानाची..??? प्रत्येकांस लागतेच; पाठीवरची थाप..!!! पण संकुचित नको हवी ती दिलखुलास; मनोभावे आली असावी दाद... काहींना ती द्यावीशी नसेल वाटत कदाचित. (maybe holding grudges for xyz reasons) काही करत असावे दुर्लक्ष "Huh..!!! ह्याचं काय नेहमीचच आहे" तर वेळेअभावी काहींच्या खरंच रहात नसावं लक्षात. कौतुक करणं ही सुद्धा एक कला आहे असं माझं वैयक्तिक मत; ती सगळ्यांनाच जमेल अशी अपेक्षा करणं म्हणजे स्वतः स्वतःची केलेली गफलत. सोपं नव्हें देणे; पाठीवरची थाप..!!! मन मोठं खुप मोठं असावं लागतं दुसऱ्यांची प्रसिद्धी पचवायला; आणि तो विलक्षण दमखम ही लागतो हमखास... पाय खेचणारे; निंदा/नैतिक घसरण करणारे (MORAL DOWN/DEMOTIVATE) रिकामटेकडे धंदे म्हणणारे; असंख्य भेटतील. प्रोत्साहित करून उचलून धरणारे मात्र अल्...